भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्याचिपरि हा मुरारी । पसरला न दिसेचि ऐसा दुरी । चालतू उदगाचिया परी । तो असुरी लक्षित

tyachipari ha murari | pasarala na disechi aisa duri | chalatu udagachiya pari | to asuri lakshit

रचनाकार: संत निळोबा · अभंग
त्याचिपरि हा मुरारी । पसरला न दिसेचि ऐसा दुरी । चालतू उदगाचिया परी । तो असुरी लक्षित ॥१॥ येतां देखोनियां कृष्णासी । दैत्य हारीखला मानसीं । म्हणे साधूनियां निजकार्यांसी । जाईन अति त्वरेंसी उडोनियां ॥२॥ ऐसें विचारुनियां मानसीं । पक्ष झाडी अति अवेशीं । म्हणे कंसाचिया पुण्यराशी । झालिया सन्मुख या काळें ॥३॥ आतां गिळुनियां नंदकुमारा । खोवीन मस्तकी यशाचा तुरा । मात जाणवीन रोश्रवरा । मथुरेशर जाऊनि उल्हासें ॥४॥ म्हणोनी आतां राहें सुखी । माझिया बळें तूं इहलोकीं । तोषवीन नृपति पुण्यलोकीं । आम्हां पाळक दैत्याचा ॥५॥ परी हा मृत्यूचि आला हें नेणतु । वृथाचि मनोरथ वाढवितु । आपआपणासीची श्रलाघवितु । महा मूर्ख तो पापराशी ॥६॥ मग अति आवेशें धांविला । कृष्णा झगटावया पातला । तंव तो तेणें आसूडिला । तोंडघशीं पडिला चरणातळीं ॥७॥ पक्ष धरुनियां दोन्ही हातें । उपटूनियां सांडिले परौतें । लोला करुनियां गोपीनाथें । चरणघातें तुडविला ॥८॥ ऐशियापरी घाबरा केला । चुंचीत धरुनियां घोळसिला । म्हणे मायाविया दाखवीं आला । मायाप्रतापु या काळें ॥९॥ बहुत दिवस मामाचें अन्न्‍ा । भक्षिलें झाडा तो घेईन । आजि मृत्युपंथे पाठवीन । गौरव करुन ताडनाचा ॥१०॥ ऐसें बोलोनियां श्रीहरि । सोडिला तंव तो दीर्घ स्वरीं । गर्जोनियां कृष्णावरी । अति तवकें उठिला ॥११॥ आधींच तंव तो निशाचर । रुप धरुनियां भयंकर । कृष्णा गिळावया सत्वर । मुख पसरुनी धंविला ॥१२॥ हें देखोलि लोक म्हणती । गिळिला गिळिला रे श्रीपती । वेगीं जाऊनियां नंदाप्रती । मात जाणवा दसवंतिये ॥१३॥ ऐसा झाला हाहाकार । कृष्णें तेचि क्षणीं अति सत्वर । ‍िफोडूनि जाभाडें दंतावळि चुर । करुनियां पाडिला ॥१४॥ मग रगडूनियां पादघातें । मुरगाळिली मुंडी होतें । दैत्य त्यागिता निज देहातें । शब्द केला आचाट ॥१५॥ म्हणे धांव धांव कंसासुरा । तुझिये काजीं वेंचलों पुरा । निळा म्हणे मग शारंगधरा । वरुनी प्राणा ओंवाळिलें ॥१६॥