भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं । वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी

ture kambala dangevari vishan venu gheuni karin | vaijanyati rule kaishi vakshasthalavari

तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं । वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥ गोविंदु वो पैल गोपाळु माये । सुरतरु तळवटीं देखे कैसा उभा राहे ॥ध्रु०॥ आडत्रिपुंड्र शोभत दूमिळ भारेंसि जे जात । नागर केशरिचीं पुष्पें कैसा खोप मिरवत ॥२॥ हिरिया ऐशा दंतपंक्ति अधर पोंवळ वेली । श्रवणीं कुंडलें ब्रह्म रसाचीं वोतलीं ॥३॥ विश्वाचें जीवन तें म्यां सार देखियलें । योगी ध्याती ध्यानीं ब्रह्म तेंचि गोकुळासि आलें ॥४॥ आजि धन्य धन्य जालें राया कृष्णासि देखिलें । निवृत्तिमुनिरायप्रसादें ध्यान तें ह्रदयासि आलें ॥५॥