भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें । आतां कां उगलें बोलूं देवा

tumhi ton sankaden bahut varilen | atan kan ugalen bolun deva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें । आतां कां उगलें बोलूं देवा ॥१॥ आजीवरी पडिलों लिगाडाचे गुंतीं । तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥ झाला दिसे मज मोकळा मारग । धिक्कारिती जग मागें पुढें ॥३॥ चोखा म्हणे ऐसें विपरीत देखिलें । तें साचचि संचलें मनीं माझ्या ॥४॥