भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हांसी कारण पडलिया सांगा । नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची

tumhansi karan padaliya sanga | namyache prasanga seva tumachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हांसी कारण पडलिया सांगा । नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची ॥१॥ संदेह मनासी नका धरुं सर्वथा । माझी आण तत्वतां तुम्हांलागीं ॥२॥ नामयाचें सांकडें वारीन मी वेगें । तुम्ही कांहीं अंगे शिणूं नका ॥३॥ एका जनार्दनीं वैकुंठींचा राणा । सांगतसे खुणा अंतरीच्या ॥४॥