भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या चरणी जें कांही आहे । तें सुख पाहे मज द्यावें

tumachya charani jen kanhi ahe | ten sukh pahe maj dyaven

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
तुमच्या चरणी जें कांही आहे । तें सुख पाहे मज द्यावें ॥१॥ सर्वांसी विश्रांति तेथें मन ठेवीं । तें सुख शांति देई मज देवा ॥२॥ सर्वांभूती दया संतांची ते सेवा । हेंचि देई देवा दुजें नको ॥३॥ चोखा म्हणे आणिक दुजें नको कांहीं । जीव तुझे पायीं देईन बळी ॥४॥