भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळशीचें पान । एक त्रैलोक्या समान

tulashichen pan | ek trailokya saman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुळशीचें पान । एक त्रैलोक्या समान ॥१॥ उठोनियां प्रात:काळीं । वंदी तुळशी माउली ॥२॥ मनींचे मनोरथ । पुरती हेंचि सत्य ॥३॥ तुळशीचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥