भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळशी वंदितां मस्तकीं । धन्य धन्य तिही लोकीं

tulashi vanditan mastakin | dhanya dhanya tihi lokin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुळशी वंदितां मस्तकीं । धन्य धन्य तिही लोकीं ॥१॥ तुळशी करतां नमस्कार । उतरे पार संसार ॥२॥ तुळशीचे नाम घेतां । हरे भवभवयाची चिंता ॥३॥ तुळशीचा करतां जप । नुरे पाप जन्मांतरींचें ॥४॥ तुळशीची करता सेवा । होय देवा प्रिय तो ॥५॥ तुळशीचें अनुष्ठान । एका जनार्दनीं शरण ॥६॥