भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिये चरणी जाण स्थिरावले मन

tujhiye charani jan sthiravale man

रचनाकार: संत बोधले · अभंग
तुझिये चरणी जाण स्थिरावले मन । आणिक मज ज्ञान न लगे काही ॥१॥ मुक्तिदासी आहेता तुजपासी । त्या नलगता आम्हासी पांडुरंगा ॥२॥ वैकुंठ कैलास न लगती आम्हास । आवडी बोधल्यास तुझे पायी ॥३॥