भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण आम्हां कोण आहें देवा । धांव यादवराया मायबापा

tujavin amhan kon ahen deva | dhanv yadavaraya mayabapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुजविण आम्हां कोण आहें देवा । धांव यादवराया मायबापा ॥१॥ पडिलोंसे डोहीं प्रपंच आवर्ती । कोण करी शांति तुजविण ॥२॥ जन्ममरणाचा पडिलासे फेरा । सोडवी दातारा मायबापा ॥३॥ एका जनार्दनीं धांवे लवलाहीं । येवोनियां हृदयीं ठाव देई ॥४॥