भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज सगुण म्हणों की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे

tuj sagun mhanon ki nirgun re | sagun nirgun eku govindure

तुज सगुण म्हणों की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥ तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे । स्थूलसूक्ष्म एक गोविंदुरे ॥२॥ तुज आकार म्हाणों की निराकररे । साकारु निरुकारु एकु गोविंदुरे ॥३॥ तुज दृश्य म्हणों कीं अदृश्यरे । दृश्यअदृश्य एकु गोविंदुरे ॥४॥ निवृत्तिप्रसाद ज्ञानदेव बोले । बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे ॥५॥