भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिवेणीसंगमी बुडती बहुत । नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा

trivenisangami budati bahut | neghe prayashchit tyanche ganga

रचनाकार: संत निळोबा · अभंग
त्रिवेणीसंगमी बुडती बहुत । नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥ ज्यांचे कर्म जैसें भोगिती ते फळ । गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥ बुडती जहाजें वायूचिया संगे । परि दोष नलगे वायूसी तो ॥३॥ निळा म्हणे तैसा परमात्मा श्रीहरी । वर्ते सर्वांतरी अलिप्तपणें ॥४॥