भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिपुटीविरहित कर कटीं उभा । त्रैलोक्याची शोभा शोभे गे माये

triputivirahit kar katin ubha | trailokyachi shobha shobhe ge maye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिपुटीविरहित कर कटीं उभा । त्रैलोक्याची शोभा शोभे गे माये ॥१॥ परे परता वैखरिये आरुता । पश्यंती निर्धारिता न कळें गे माये ॥२॥ मध्यमा मध्यमीं उभा तो स्वयंभ । अद्वयांनंद कोंभ कर्दळीचा गे माये ॥३॥ एका जनार्दनीं आहे तैसा भला । हृदयीं सामावाला माझ्या गे माये ॥४॥