भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिपदा चतुष्पदा गायत्रीस्मरण

tripada chatushpada gayatrismaran

त्रिपदा चतुष्पदा गायत्रीस्मरण । त्याचे विस्मरण हरिप्रेमें ॥१॥ निवृत्ति सांगे हरीनामगंगें । जालासि सर्वागें गंगोदक ॥२॥ पाणिपाद चित्तवृत्ति हे बुडाली । देहीं गेहा गेली प्रीति सदा ॥३॥ चक्षुद्वयतेज हरिरुपीं बिंबे । पृथ्वीतळ अंभ हरि दिसे ॥४॥ सुलज्ज निर्लज्ज मेघवर्णशाम । सांवळा सप्रेम गुणग्राह्य ॥५॥ थोडेनि आतुडें सडेनि पदार्थें । येतु असे अर्थे ह्रदयामाजी ॥६॥ नाम मंत्र रुप इतुकेन संकेत । देतुसे अर्थ दीनाचा दाता ॥७॥ बापरखुमादेवीवरुविनत सोपारा । मरणाच्या येरझारा दुर केल्या ॥८॥