भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिकाळ साधन न लगे अनुष्ठान । आसन वसन त्याग नको

trikal sadhan na lage anushthan | asan vasan tyag nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिकाळ साधन न लगे अनुष्ठान । आसन वसन त्याग नको ॥१॥ सोपें सोपेंक जपा आधीं रामनाम । वैकुंठींचे धाम जपतां लाभें ॥२॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । तरेल तें खेप चौर्‍यांशींची ॥३॥