भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो

trigunatmak trimurti vegala | pahe to sanvala dattaravo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥ मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं । नाहीं आन मनीं दुजा छंद ॥२॥ परात्पर पहावा हृदयीं तैसा ध्यावा । एका जनार्दनीं सांठवावा दत्त मनीं ॥३॥