भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनीं तुमची थोरी । पतितपावन म्हणती हरि

tribhuvanin tumachi thori | patitapavan mhanati hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिभुवनीं तुमची थोरी । पतितपावन म्हणती हरि ॥१॥ तें हें तारक सत्यनाम । शंकराचा तूं विश्राम ॥२॥ ब्रीद गाजे पतिताचें । तिहीं लोकी तुमचें साचें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । आम्हीं पतित तूं पावन ॥४॥