भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला

tribhuvanamajin chale jyachi satta | mhane tattvatan chor ala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला ॥१॥ तयाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे बोल नवल चोज ॥२॥ एका जनार्दनीं दावुनी लाघव । सांवत्याचें वैभव प्रगट करी ॥३॥