भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनामाजी पंढरी थोर

tribhuvanamaji pandhari thor

रचनाकार: संत बोधले · अभंग
त्रिभुवनामाजी पंढरी थोर । तेथील सेठ्या पुंडलिक भला रे ॥१॥ पतित पावन जडमूढ भारी । तयास कौल दिल्हा रे ॥२॥ निंदक दुर्जन कंटक भारी । कौल नाही तयाला रे ॥३॥ अनंत कोटी पुण्य जयांचे । तोचिये पेठेसी आले रे ॥४॥ नामाचे भरित भरितो भला । अभागी चुकला करंटा रे ॥५॥ बोधला म्हणे कैवल्य आले । दुकान तेथे बोधला रे ॥६॥