भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे

tribhangi dehuda than manduniya maye | kalpadrumatalin venu vajavit ahe

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥ गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमनंदुवो ॥ध्रु०॥ सांवळे सगुण सकळा जिवांचें जीवन । घनानंद मूर्ति पाहतां हारपलें मन ॥२॥ शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥