भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रैलोक्याचा जो धनी । समचरणीं पंढरीये

trailokyacha jo dhani | samacharanin pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रैलोक्याचा जो धनी । समचरणीं पंढरीये ॥१॥ धरुनियाबाळरुपी । उभाचि पहा पा विटेवरी ॥२॥ शोभताती संतभार । करतीं जयजयकार नामघोष ॥३॥ पुढें दक्षिनवाहिनी भीमा । ऐसा महिमा तेथीचा ॥४॥ एका जनार्दनीं वेधलें मन । लागलें ध्यान विठोबाचें ॥५॥