भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थ व्रत नेम भावेंविण सिध्दि

tirtha vrat nem bhavenvin sidhdi

तीर्थ व्रत नेम भावेंविण सिध्दि । वायांचि उपाधी करिसी जना ॥१॥ भावबळे आकळे येर्‍हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥ पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझ्यां हातीं ॥४॥