भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिहीं त्रिभुवनीं पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी

tihin tribhuvanin pataki pidile | te mukta jahale pandharisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तिहीं त्रिभुवनीं पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी ॥१॥ पाहतां सांवळा अवघीयां विश्रांती । दरुशनें शांतीं पातकीयां ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडे । कैवल्य उघडे विटेवरी ॥३॥