भजनी मालिका
← भजनांकडे परत

थोर प्रभात हे झाली । उठ गे कृष्णे तू माऊली

thor prabhat he jhali | uth ge krushne tu mauli

रचनाकार: संत बोधले · अभंग
थोर प्रभात हे झाली । उठ गे कृष्णे तू माऊली । आम्हा प्रेमपान्हा घाली । अगा तू कृष्णा जननीये ॥१॥ तू तर माऊली आमची। थोर सावली संतांची । विश्रांती तुझिया नामाची । अगा तू कृष्ण जननीये ॥ २॥ आजची पूर्वकाळ थोर । गाई वत्सी करी एकधार । आम्हा दिना करि गा उध्दार । अगा तू कृष्ण जननीये ॥३॥ बोधला म्हणे आवड देई । आणिक न मागे तुज काही । आवड तुझे पायी । अगा तू कृष्ण जननीये ॥४॥