भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेथें रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीतादेवी

tethen ravanacha garva parihar | parnili sundar sitadevi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तेथें रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीतादेवी ॥१॥ देवी दुंदुभीं वाजविल्या अपार । तेव्हां कळों सरे भार्गवासी ॥२॥ भार्गव पातला आला गर्वराशी । कोणें धनुष्यासी सोडियलें ॥३॥ भंगियेला गर्व तोषला भार्गव । एका जनार्दनीं अपुर्व आशीर्वाद ॥४॥