भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेजाचें जें तेज तेंचि परब्रह्मा । परम मंगलधाम त्यासी म्हणती

tejachen jen tej tenchi parabrahma | param mangaladham tyasi mhanati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तेजाचें जें तेज तेंचि परब्रह्मा । परम मंगलधाम त्यासी म्हणती ॥१॥ तेंचि नेमियेलें जोडोनियां कर । व्यापुनी चराचर भरलेसें ॥२॥ एका जनार्दनीं तोचि पुरुषोत्तम । मनासी आराम तया ठायीं ॥३॥