भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरुणी रजकी नूतन यौवनी । बैसली रुसुनी एकान्तासी

taruni rajaki nutan yauvani | baisali rusuni ekantasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तरुणी रजकी नूतन यौवनी । बैसली रुसुनी एकान्तासी ॥१॥ धुंडुनियां मातें धाडी सासुरिया । तो म्हणे मी राया ऎसा नोहे ॥२॥ येरी म्हणे मी तों कुळींची निर्दोष । शुध्द माझा वंश रजकाचा ॥३॥ ऎकिला संवाद दौंडीकरें त्याचा । आणि विनोदाचा समाचार ॥४॥ एका जनार्दनीं धाऊनियां दूत । रायासी ती मात सांगताती ॥५॥