भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग योग । सोहं नव्हे

tari sohan navhe yag | sohan navhe tyag | ani ashtang yog | sohan navhe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग योग । सोहं नव्हे ॥१॥ सोहं नव्हे दान । सोहं नव्हे तीर्थ । मंत्रादि दीक्षित । सोहं नव्हें ॥२॥ सोहं नव्हे वारा । पंचभूतांचा पसारा । सोहंच्या विचारा । साधु जाणती ॥३॥ एका जनार्दनीं । आपण आपणासी जाणणें । साक्षित्व देखणें । तेंचि सोहं ॥४॥