भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ । करीत वेदघोश कल्लोळ । पदें क्रमें निरुक्तें

tanv krushnabhonvate goval | bhasati chaturmukhachi sakal | karit vedaghosh kallol | paden kramen nirukten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ । करीत वेदघोश कल्लोळ । पदें क्रमें निरुक्तें ॥१॥ ब्रम्हा म्हणे हें नवल झालें । ते तेथिल येथें हे कोठूनि आले । चतुर्मुखहि दिसती भले । न कळे महिमान श्रीहरिंचें ॥२॥ मग जोडूनियां पाणीतळ ॥३॥ चरणीं ॥ ठेवूं इच्छी निढळ । त्राहें त्राहें जी मी केवळ । दास डिंगर कृष्णा तुझा ॥३॥ ऐसा एक सुवत्सर । करीत होता नमस्कार । म्हणे वत्सें आणि कुमर । आणवाल तरी आणितों ॥४॥ इकडे कृष्ण गोवळमेळीं । आपणासवें आपण धुमाळी । खेळत आला पर्वतातळी । आणि वत्समुखें हुंबरला ॥५॥ चरतां पर्वत मस्तकीं गाई । ऐकोनी हुंकारिल्या ते ठायीं । मग उडया घालुनियां पाही । पाजविती पान्हा वत्सांसी ॥६॥ निळा म्हणे जगत्रयजीवन । वत्सें झाला असे आपण । यालागीं स्नेहाचें महिमान । अधिकाधिक् गाईपोटी ॥७॥