भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव आली वार्षिक यात्रा । करणें इंद्रपूजा सर्वत्रां । गोरसें काढुनी कावडी भरा । हाकारी तराळ नंदआज्ञा

tanv ali varshik yatra | karanen indrapuja sarvatran | gorasen kadhuni kavadi bhara | hakari taral nandaadnya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तंव आली वार्षिक यात्रा । करणें इंद्रपूजा सर्वत्रां । गोरसें काढुनी कावडी भरा । हाकारी तराळ नंदआज्ञा ॥१॥ जाऊनियां पर्वतासी । सुरपती पुजावा प्रतिवरुषीं । जागोनियां त्याची दिवसासी । निदसुरियां देती आठव ॥२॥ म्हणती उच्छिष्ट न करावें गोरस । दूध दहीं तूप सायास । लोणी भरुनियां कावडीस । रंग लावावा घागरमाळा ॥३॥ ध्वजा कुंचे सिध्द करा । विदया लावूनियां अपारा । जावें परिवारेंसी सत्वरा । प्रात:काळीं देवपूजे ॥४॥ गोवर्धनीं सुररावो । पूजा इच्छी देखोलि भावो । यालागीं सकळही समुदावो । जावें आपुल्या कल्याणा ॥५॥ मेघा तोषोनि यावरी । इच्छिल्या ऐसी वृष्टि करी । तेणें पिकती घुमरी । आणि गोधनेंही दुभती ॥६॥ निळा म्हणे ऐकोनि श्रवणीं । विस्मय मानी चक्रपाणी । म्हणे मज प्रत्यक्षा सांडुनी । कैंचा इंद्र आणियला ॥७॥