भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची

tali vajavavi gudhi ubharavi | vat he chalavi pandharichi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥ पंढरीचा हाट कउलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥ पताकांचे भार मिळाले अपार । होतो जय जयकार भीमातीरीं ॥३॥ हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥ खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥