भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वरुपीं पाहतां बिंबीं बिंब उमटे । तें मेघ:श्याम दाटे बुंथि मनीं

svarupin pahatan bimbin bimb umate | ten megh:shyam date bunthi manin

स्वरुपीं पाहतां बिंबीं बिंब उमटे । तें मेघ:श्याम दाटे बुंथि मनीं ॥१॥ चित्त वित्त हरि जाला वो साजणी । अवचिता आंगणीं म्यां देखियला ॥ध्रु०॥ सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडें । दिसे चहूंकडे एक तत्त्व ॥२॥ ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसूनि बाही । एका रुपें बाही तरशील ॥३॥