भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनि देख

svarga narak ihalok | yanchi priti sandoni dekh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनि देख ॥१॥ भावें करितां माझी भक्ति । भाविक आपें आप उद्धरती ॥२॥ गव्हांची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्न त्याची होतीं ॥३॥ द्रव्य जाहलें आपुलें हातीं । सकल पदार्थ घरां येती ॥४॥ एका जनार्दनीं बोध । सहज घडी एकविध ॥५॥