भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाहीं पराधीनता जिणें आमुचें

svarga mrutyu patal sarvavari satta | nahin paradhinata jinen amuchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाहीं पराधीनता जिणें आमुचें ॥१॥ नाहीं त्या यमाचे यातनेंचे भय । पाणी सदा वाहे आमुचे घरीं ॥२॥ नाहीं जरामरण व्याधीचा तो धाक । सुखरुप देख सदा असों ॥३॥ एका जनार्दनीं नामाच्या परिपाठ । सुखदुःख गोष्टी स्वप्नीं नाहीं ॥४॥