भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्र पाळी पिंड देखा । शेषासरिखी बैसका । जो आधार तिही लोकीं

svarga jayachi salonkha | samudra pali pind dekha | sheshasarikhi baisaka | jo adhar tihi lokin

स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्र पाळी पिंड देखा । शेषासरिखी बैसका । जो आधार तिही लोकीं ॥१॥ लिंग देखिलें देखिलें । त्रिभुवनीं विस्तारलें ॥२॥ मेघधारीं तपन केलें । तारापुष्पीं वरी पूजिलें । चंद्रफ़ळ ज्या वाहिलें । वोवाळिलें रविदीपें ॥३॥ आत्मनैवेद्य समर्पिलें । ब्रह्मानंद मग वंदिलें । ज्योतिर्लिंग मग ध्याईलें । ज्ञानदेवीं ह्रदयीं ॥४॥