भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळां । तंव चराचर अवघें श्रीदत्तची लीला

svanande avadi datta pahun gelon dolan | tanv charachar avaghen shridattachi lila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळां । तंव चराचर अवघें श्रीदत्तची लीला ॥१॥ विस्मयो दाटला आतां पाहुं मी कैसें । देखता देखणें अवघे दत्तचि दिसे ॥२॥ असे आणि नसे हा तंव विकल्प जनांत । जनीं जनार्दन निजरुपें दत्त ॥३॥ एका जनार्दनीं तेथें अद्वय नित्य । सबाह्म अभ्यंतरी दत्त नांदत ॥४॥