भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखीं सांठविलें सुख । हरिखा हरिख भेटविला

sukhin santhavilen sukh | harikha harikh bhetavila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुखीं सांठविलें सुख । हरिखा हरिख भेटविला ॥१॥ आनंदासी आनंद झाला । सद्गुरु भेटला तेचि क्षणीं ॥२॥ प्रतीतीसही प्रतीत झाली । शांति मेळवविली निजशांती ॥३॥ निळा म्हणे सुकाळ ऐसा । केला दशदिशा कोंदलीया ॥४॥