भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें मुख सोज्वळ पहातां दृष्टी । आनंदी आनंदमय तेणे सृष्टी

sukhen mukh sojval pahatan drushti | anandi anandamay tene srushti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुखें मुख सोज्वळ पहातां दृष्टी । आनंदी आनंदमय तेणे सृष्टी ॥१॥ देखिला देखिला वैष्णवांचा रावो । देवाधिदेवी श्रीविठ्ठल ॥२॥ गोपाळ गजरीं नाचतीं आनंदें । लीला विनोदें प्रेमरसें ॥३॥ भावाचा अंकित उगा रहए उभा । धन्य त्याची शोभा काय वानूं ॥४॥ पाहतां पाहतां मन धालें सृष्टी । जनार्दनाचा एका परमानंदें पोटीं ॥५॥