भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें करावें भोजन । गर्जावे गुण श्रीहरिचे

sukhen karaven bhojan | garjave gun shrihariche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुखें करावें भोजन । गर्जावे गुण श्रीहरिचे ॥१॥ ल्यावें लेणें अळंकार । असावें सादर हरिकथे ॥२॥ यथाविधी भोगितां भोग । ह्रदयीं पांडुरंग आठवावा ॥३॥ निळा म्हणे न लिंपे कर्मा । हरिनाम धर्मा अवलंबितां ॥४॥