भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखरुप धन्य जाणावा संसारी । सदा वाचे हरि उच्चारी जो

sukharup dhanya janava sansari | sada vache hari uchchari jo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुखरुप धन्य जाणावा संसारी । सदा वाचे हरि उच्चारी जो ॥१॥ रामकृष्णानाम वदे वेळोवेळां । हृदयीं कळवळां संतभेटी ॥२॥ एका जनार्दनीं प्रेमाचा कल्लोळ । भुक्ति मुक्ति सकळ वसे देव ॥३॥