भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखरूप असतां म्हणे माझें माझें । संकट देखोनियां घाली देवावरी वोझें

sukharup asatan mhane majhen majhen | sankat dekhoniyan ghali devavari vojhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुखरूप असतां म्हणे माझें माझें । संकट देखोनियां घाली देवावरी वोझें ॥१॥ पापी तो अधममती । कदा नेणे नामस्मरण गती ॥२॥ नामावांचोनि गती नाहीं । ऐसेंक वेदशास्त्र बोलती पाहीं ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे भुलला । पुनः अधम जन्मा आला ॥४॥