भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें असे

sukhachen jen sukh chandrabhagetatin | pundalikapathin ubhen ase

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें असे ॥१॥ साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥ कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापहा ॥३॥ चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥