भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख वांटे परी हें दु:ख । भोगविल नर्क परिपाकीं

sukh vante pari hen du:kha | bhogavil narka paripakin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुख वांटे परी हें दु:ख । भोगविल नर्क परिपाकीं ॥१॥ म्हणोनियां सांडीं आशा । भजें सर्वेशा विठठला ॥२॥ जेणें कधींचि नये तुटी । लाभें कोटी कल्प जिणें ॥३॥ निळा म्हणे पावसी पदा । येथें आनंदा निजवस्ती ॥४॥