भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्नानसंध्या शौचाचार । स्वधर्म नावडे साचार

snanasandhya shauchachar | svadharma navade sachar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्नानसंध्या शौचाचार । स्वधर्म नावडे साचार ॥१॥ कनकफळ नाम गोमटें । बाहेर आंत दिसे कांटे ॥२॥ शरीर श्वेत निर्नासिक । तोंडाळ ओढाळ पतिनिंदक ॥३॥ ऐशीं आचारहीन बापुडीं । एका जनार्दनीं न धरी जोडी ॥४॥