भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचें सुफळ । कोटी गुणें विशाळ । पुण्य हातां चढतसे

snan danachen ek phal | tyahuni namachen suphal | koti gunen vishal | punya hatan chadhatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचें सुफळ । कोटी गुणें विशाळ । पुण्य हातां चढतसे ॥१॥ धन्य धन्य नाम श्रेष्ठ । गाय अखंड नीळकंठ । आणिक श्रेष्ठ श्रेष्ठ । नाम मुखीं जपताती ॥२॥ नाम त्रिभुवनीं साजिरें । नाम पावन गोजिरें । एक जनार्दनीं निर्धारें । सांगें ब्राह्मा उभारूनी ॥३॥