भजनी मालिका
← भजनांकडे परत

सीत बुंद प्राप्त ज्यासी । निजात्मसुखासी तो पावे

sit bund prapta jyasi | nijatmasukhasi to pave

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सीत बुंद प्राप्त ज्यासी । निजात्मसुखासी तो पावे ॥१॥ जेथें उभे संतजन । नारायण समावेत ॥२॥ तया सुखा उणें नाहीं । लोकीं तिहीं पूज्य तो ॥३॥ निळा म्हणे हरीचे शेष । करीत नाश कल्मषा ॥४॥