भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्धभावें गावें नाम श्रीहरींचें । भेदभाव साचे टाकूनियां

shuddhabhaven gaven nam shriharinchen | bhedabhav sache takuniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शुद्धभावें गावें नाम श्रीहरींचें । भेदभाव साचे टाकूनियां ॥१॥ भोळे भाविक ज्याचा आहे देव जवळा । टवाळास निराळा भास दिसे ॥२॥ अविश्वासियासी होय बोध वायां । ब्रह्माज्ञान तया सांगुन काय ॥३॥ एका जनार्दनीं अभाविक खळ । बोध तो सकळ जाय वायां ॥४॥