भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रुतीं सांगितलें उपनिषदीं अनुवादलें

shrutin sangitalen upanishadin anuvadalen

श्रुतीं सांगितलें उपनिषदीं अनुवादलें । आम्हा लाधलें निरुतें वर्म । अनुभवे गोविंदु करितां अनुवादु । परब्रह्म अनुवादु तरि तें नव्हे ॥१॥ बोलिजे तें नव्हे दाविजे तें नव्हे । गुरुमुखी पाहावें परमानंदीं ॥२॥ अरुप परि बरवे दिसें । भीतरी कैसें निववीतुसे । अनुभविया प्रति बोलिजे लक्षण । ज्ञानदेवें खुण सांगितली ॥३॥