भजनी मालिका
← भजनांकडे परत

शृंगें पसरिले जैसे शूळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ । श्वास रंध्रीं धूमकल्लोळ । डरकिया अंतराळ दुमदुमितो

shrungen pasarile jaise shul | netrinhuni nighati jval | shvas randhrin dhumakallol | darakiya antaral dumadumito

रचनाकार: संत निळोबा · अभंग
शृंगें पसरिले जैसे शूळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ । श्वास रंध्रीं धूमकल्लोळ । डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥१॥ मागें सरे पुढे धांवे । आडवाचि उडे उंच उंचावे । ऐशीं दावूनियां लाघवें । हरिसन्निध पातला ॥२॥ देव हाणे मुष्टी घातें । तेणें आर्डाय दुखवोनि तेथें । सवेंचि सरसावोनियां वरिते । उपसों धांवे गोंविंदा ॥३॥ दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रोढीगौरव । मग धेनुकें करुनियां । कृष्णातळीं संचारला ॥४॥ येरें रगडूनि तेथेंचि धरिला । दोन्ही शिंगी हात घातला । मग ते उपटुनी त्राहाटिला । निघात घातें खडकावरी ॥५॥ ऐसा करुनियां शतचूर्ण । रक्त मांस त्वचा भिन्न्‍ा । अस्थि तिळप्राय होऊन । गेल्या उडोनि दाहिदिशा ॥६॥ निळा म्हणे ऐशियापरी । धेनुका मुक्तीची शिदोरी । देऊनि पाठविला श्रीहरि । आपुलिया निजधामा सुखवस्ती ॥७॥