भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोधूनी अन्वये वंशवंशावळी । परंपरा कुळीं उच्चारण

shodhuni anvaye vanshavanshavali | parampara kulin uchcharan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
शोधूनी अन्वये वंशवंशावळी । परंपरा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविले पूर्वी जैसे होते तैसे । केले सामरस्यें समाधान ॥२॥ येक छत्र झळके उन्मनि निशाणी । अनुहाताचा ध्वनि गगन गर्जें ॥३॥ निळयास्वामी स्थापी निजपदीं दासा । करुनि उल्हास आवडिचा ॥४॥