भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिष्यापासून सेवा घेणें । हें तो लक्षण अधमाचें

shishyapasun seva ghenen | hen to lakshan adhamachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिष्यापासून सेवा घेणें । हें तो लक्षण अधमाचें ॥१॥ ऐसें असतीं गुरु बहु । नव्हेंचि साहुं भार त्यांचा ॥२॥ एकपणें समानता । गुरुशिष्य उरतां उपदेश ॥३॥ एका जनार्दनीं शरण । गुरु माझा जनार्दन ॥४॥